Home > News Update > राष्ट्रवादीतल्या भ्रष्ट नेत्याची चौकशी करुन कारवाई करा

राष्ट्रवादीतल्या भ्रष्ट नेत्याची चौकशी करुन कारवाई करा

राष्ट्रवादीतल्या भ्रष्ट नेत्याची चौकशी करुन कारवाई करा
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका सभेत राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आज नाशिक येथील सभेमध्ये शरद पवार (sharad pawar)यांनी मोदींच्या या वक्तव्याला मोठे आव्हान दिले आहे. ते म्हणाले की पंतप्रधानांना जर आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारी वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या संपूर्ण सत्तेचा वापर करुन या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. भ्रष्ट असलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा असेल. शरद पवारांच्या या वक्तव्याचा रोख नक्की कुणाकडे होता ? राष्ट्रवादी पक्षामधील तो भ्रष्ट नेता नक्की कोण आहे ? शरद पवारांच्या या विधानानंतर आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.on on

Updated : 8 July 2023 7:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top