आंतरराष्ट्रीय युवा दिवस(InternationalYouthDay) का होतो साजरा?
आज संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा होत आहे. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जगभर युवा दिवस साजरा होतो.
X
मुंबई // आज संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा होत आहे. दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जगभर युवा दिवस (InternationalYouthDay) साजरा होतो. विविध उपक्रमांद्वारे हा आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. आपल्या भारत देशाला सर्वात तरुण देश म्हणून संबोधले जाते, कारण भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त तरुण आहेत. त्यामुळे या InternationalYouthDay चे भारतात विशेष महत्व आहे.
InternationalYouthDay कधीपासून आणि का साजरा केला जातो?
संयुक्त राष्ट्र महासभेने १७ ऑगस्ट १९९९ ला InternationalYouthDay १२ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी जबाबदार मंत्र्यांच्या जागतिक परिषदेने १९९८ मध्ये केलेल्या सूचनेनंतर हा निर्णय घेतला होता. InternationalYouthDay सर्वात पहिल्यांदा २००० साली साजरा करण्यात आला होता.
प्रत्येक देशाचं भविष्य हे तेथील तरुणांवर अवलंबून असतं. देशांतील युवकांची- तरुणांची मूल्य, प्रगती, विचारधारा, प्रत्येक कृती, प्रत्येक पाऊल,प्रत्येक निर्णय हा त्या देशाची पुढची दिशा ठरवत असतो. म्हणूनच प्रत्येक देशाची खरी ताकद आहे ती म्हणजे त्या देशातील तरुण.
InternationalYouthDay कसा साजरा केला जातो?
InternationalYouthDay निमित्त दरवर्षी संयुक्त राष्ट्र एक थीम निवडते. त्यानुसार, जगभरातील युवकांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. साधारणतः या कार्यक्रमांमध्ये जनजागृती मोहिम, सामुहिक कार्यक्रम आणि परेड, प्रदर्शन यांचा समावेश असतो. त्याबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून जगभरातील तरुणांशी संवाद साधला देखील जातो.
आंतरराष्ट्रीय युवा दिनाची यंदाची थीम आहे "ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टम्स: युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ". मागील जवळपास दीड वर्षांपासून जगभर कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यामुळे यंदा InternationalYouthDay वर कोरोनाचे सावट आहे. मात्र तरी देखील विविध माध्यमातून जगभर InternationalYouthDay साजरा होत आहे.