जागतिक व्यापाराचा 'शॉर्टकट' ब्लॉक झालाय...
चीनहून नेदरलँडसच्या दिशेने जाणारे मालवाहतूक करणारे विशाल जहाज सुएझच्या कालव्यात अडकल्यामुळे समुद्रात जहाज कोंडी झाली असून मालवाहतूक करणारी अनेक जहाजे समुद्रात खोळंबली आहेत. भारताच ४०० कोटीचा शेतमाल अडकला असून या जहाजकोडींमुळे तासाला तीन हजार कोटीचं नुकसान होत असून जागतिक स्तरावर युध्दपातळीवर ही कोंडी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
X
सुएझच्या कालव्यात चीनहून मालवाहतूक करणारे एवर गिव्हन महाकाय कंटनेर जहाज अडकले आहे. यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जॅम झाले आहे. सुएझ कालवा १९३.३ किमी लांबीचा असून भूमध्य समु्द्र आणि लाल समुद्राला हा कालवा जोडतो. अडकलेल्या जहाजावर पनामा देशाचा झेंडा लावला आहे.
पाच दिवसापूर्वी मंगळवारी सकाळी सुएझच्या कालव्यातून जाताना नियंत्रण गमावल्याने ४०० मीटर लांब आणि ५९ मीटर रुंद आणी 200,000 टन वजन असणारे हे महाकाय जहाज अडकले. मालवाहतूक करणाऱ्या जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टग बोट्स (जहाजांना धक्का देणाऱ्या शक्तिशाली जहाज) तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीदेखील हे जहाज तेथून बाहेर काढण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
हे मालवाहतूक करणारे जहाज अडकल्यानंतर लाल सागर आणि भूमध्य सागराच्या किनारी मोठ्या संख्येने जहाज उभे आहेत. या कालव्याच्या माध्यमातून दररोज हजारो जहाज आशिया-युरोप दरम्यान प्रवास करत असतात. सुएझ कालव्यातील हा मार्ग आणखी काही काळ बंद राहिल्यास जहाजांना आफ्रिका खंडाला (केप ऑफ गुड होप) वळसा घालून युरोपमध्ये जावे लागणार आहे.
भारतालाही या जहाज कोंडीचा मोठा फटका बसला असून महाराष्ट्रातून युरोपला पाठवला गेलेला जवळपास ₹400 कोटींचा कृषीमाल सुवेझ कॅनलच्या अलीकडे 1300 कंटेनर्समधे अडकून पडला आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी वर्गाचं मोठं नुसकान होत आहे.
पनामा देशाचा झेंडा असलेला हे कंटेनर जहाज चीनहून नेदरलँड्समधील रॉटरडॅम बंदरावर जात होते. या दरम्यान त्याने हिंदी महासागरातून युरोपमध्ये जाण्यासाठी सुएझ कालव्याचा जलमार्ग वापरला. मंगळवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार ७.४० वाजता सुएझ कालव्याच्या उत्तर भागात अडकला. हे जहाज २०१८ मध्ये तयार करण्यात आले होते.
तैवानची ट्रान्सपोर्ट कंपनी एव्हरग्रीन मरीन या जहाजाला संचलित करत असल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तानुसार, एव्हर गिवेन या जहाजाच्या चालकांनी सांगितले की, सुएझ कालवा पार करत असताना एक वादळ आले. त्यामुळे जहाजाची दिशा बदलली. जहाजाची दिशा पूर्वपदावर करण्या प्रयत्न करण्यात येत असताना जहाज एका ठिकाणी अडकले. या जहाजामागे आणखी एक मालवाहतूक करणारे जहाज अडकले आहे.
शनिवारी समुद्राची भरतीदरम्यान जहाज हलवण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतू ते प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सुवेझ कालवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की काही प्रगती झाली आहे आणि रविवारी संध्याकाळपर्यंत भरतीदरम्यान पुन्हा प्रयत्न करण्यात येतील. त्यानंतर कदाचित हे जहाज पुन्हा प्रवाशी होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.
शनिवारी सुमारे 20,000 टन वाळू उपसा करण्यात आला, आणि 14 टगबोट्सचा वापर करुन
एवर गिव्हन महाकाय कंटनेर जहाज हलवण्याचा पयत्न झाला. जोरदार लाटा आणि वारा जहाजे सोडविण्यासाठीचे जटिल प्रयत्न असले तरी टगबोट्सने ते दोन दिशेने 30 अंश हलविण्यात यश मिळवले आहे.
महाकाय जहाजाचे ओझे कमी करण्यासाठी जहाजातील 18,300 कंटेनरंपैकी सगळे बाहेर काढण्याची गरज नाही.
शनिवारी प्रयत्न अयशस्वी झाल्यास अधिक टगबोट पाठवू असे कालवा प्राधिकरणाने सांगितले होते.