Home > News Update > महामहिम राज्यपाल आरोपीला नका नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवा - नवाब मलिकांचा टोला
महामहिम राज्यपाल आरोपीला नका नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवा - नवाब मलिकांचा टोला
Instead of showing sympathy to criminals governor should show sympathy to naik family गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपाल यांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असे सांगतानाच एका आरोपीची बाजु घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 Nov 2020 6:06 PM IST
X
X
राज्यपाल यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला असून यावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या राज्यात प्रत्येक जेलमध्ये असणाऱ्या कैद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची जबाबदारी सरकारची असते. जेलमधील कैद्याला नातेवाईकांना भेटण्यासही परवानगी दिली जात असते. परंतु ज्यापध्दतीने राज्यपाल एक विशेष कैदी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवतात. नाईक कुटुंब बरेच महिने न्यायासाठी भटकत होते त्यांची बाजू न घेता एका आरोपीची घेणे हे योग्य नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
Updated : 9 Nov 2020 6:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire