Home > News Update > Omicron च्या BA-5 उपप्रकाराचा भारतात प्रवेश

Omicron च्या BA-5 उपप्रकाराचा भारतात प्रवेश

Omicron च्या BA-5 उपप्रकाराचा भारतात प्रवेश
X

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या चौथ्या आणि पाचव्या लाटेला कारणीभूत ठरलेला Omincron विषाणूच्या BA-4 आणि BA- 5 या उपप्रकारांचा भारतात प्रवेश झाला आहे. तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये या उपप्रकाराची लागण झालेले २ रुग्ण आढळले आहेत. लागण झालेली व्यक्त ८० वर्षांची असून त्यांना सौम्य लक्षणं असल्याची माहिती मिळते आहे. यापैकी तामिळनाडूमध्ये BA-4 उपप्रकाराची लागण झालेल्या १९ वर्षीय तरुणीला सौम्य लक्षणं आहेत. पण तिने कोणताही परदेश प्रवास केलेला नाही, अशी माहिती एएनआयने दिलेल्या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. तसेच याच BA-4 उपप्रकाराची लागण झालेला एक रुग्ण हैदराबाद विमानतळावर नुकताच आढळला आहे.

दरम्यान परदेश प्रवासाची कोणतीही पार्श्वभूमीवर नसलेल्या बाधीत रुग्णांच्या संपर्कातील इतरांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लागण झालेल्या दोन्ही रुग्णांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत,अशी माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. कोरोनाच्या उपप्रकारांची सुरूवात दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर्षी झाली होती. त्यानंतर या विषाणूची लागण झालेले अनेक रुग्ण जगभरातील अनेक देशांमध्ये आढळले होते. पण या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक देशांमध्ये आलेल्या चौथ्या आणि पाचव्या लाटेची तीव्रता मात्र कमी होती.

Updated : 23 May 2022 4:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top