महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाईफेक, मंगळवारी बेळगाव बंदची हाक
X
बेळागवमध्ये पुन्हा एकदा कानडी दादागिरीचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे. तर दुसरीकडे बेळगाव पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला आडकाठी देखील केली आहे. तर दुसरीकडे कानडी गुंडाना संरक्षण देण्यात आल्याता आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. तसेच या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी 14 तारखेला बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर महामेळावा सुरू असताना कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकत हल्ला केला. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. याच्या विरोधात एकीकरण समितीने एका मेळाव्याचे आयोजन केले आहे. पण सोमवारी कन्नड वेदिका रक्षण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्याशी चर्चा करणार असल्याचा बहाणा केला आणि त्यांना बाजूला नेत शाई फेकण्यात आली.