इंदोरीकर महाजारांना कोर्टाचा दिलासा
X
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या इंदोरीकर महाराजांना कोर्टाने थोडासा दिलासा दिला आहे. संगमनेर न्यायालयाने दिलेल्या आदेशाला जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांना संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसणार आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाला 20 ऑगस्टला सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे.
हे ही वाचा...
आत्महत्येचा बनाव रचून गुन्हा लपवता येतो का?
चीनी घुसखोरीची कबुली देणारी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन गायब
आंबेडकरवादी मिशनचे16 विद्यार्थी UPSC परीक्षेत यशस्वी
'सम तारखेला स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा विषय तारखेला स्त्रीसंग केला तर मुलगी होते' असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. काही सामाजिक संघटनांनी इंदुरीकर महाराजांवर कारवाईची मागणी केली होती.