Home > News Update > indigo flight fire : उड्डाणादरम्यान इंडिगोच्या विमानाला आग

indigo flight fire : उड्डाणादरम्यान इंडिगोच्या विमानाला आग

Indigo Flight Fire : दिल्ली विमानतळावर उड्डाण करत असताना इंडिगो कंपनीच्या (Indigo) विमानाच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली. यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

indigo flight fire : उड्डाणादरम्यान इंडिगोच्या विमानाला आग
X

Indigo Delhi Bangalore flight fire at indira gandhi international airport

Indigo Flight Fire : दिल्ली विमानतळावर उड्डाण करत असताना इंडिगो कंपनीच्या विमानाच्या इंजिनला आग लागली. मात्र विमानातील 177 प्रवासी आणि 7 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे इंडिगो कंपनीच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिल्लीहून बंगळूरला निघालेल्या इंडिगो विमानाला उड्डाणादरम्यान आग लागली होती. या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने ट्वीट केला आहे. यामध्ये उड्डाणादरम्यान आग लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport New delhi) इंडिगो कंपनीच्या विमानाला आग लागली होती. त्यानंतर तातडीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाकडून पाऊलं उचलत या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या घटनेनंतर सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगत बंगळूरला (Banglore) जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे इंडिगो कंपनीने म्हटले आहे.

Updated : 29 Oct 2022 9:01 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top