Home > News Update > भारतीयांची स्विस बॅंकेंत 20,700 कोटी, 13 वर्षातील सर्वात मोठा आकडा

भारतीयांची स्विस बॅंकेंत 20,700 कोटी, 13 वर्षातील सर्वात मोठा आकडा

भारतीयांची स्विस बॅंकेंत 20,700 कोटी, 13 वर्षातील सर्वात मोठा आकडा
X

ये जो चोर लुटेरो के पैसे विदेशी बॅंकोमे जमा है ना? उतने भी हम ले आये ना? तो भी हिंदूस्थान के एक एक गरिब आदमी को मुफ्त मे 15... 20 लाख यू ही मिल जाएगा... इतने रुपये है. असं म्हणणाऱ्या मोदींच्या कार्यकाळात स्विस बॅकेत भारतीयांचा पैसा 20,700 कोटी इतका झाला आहे. Swiss banks

स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकांकडून जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

स्विस नॅशनल बँक (एसएनबी) च्या आकडेवारीनुसार, सन 2019 च्या अखेरपर्यंत भारतीयांची जमा असलेली रक्कम जवळपास 899 कोटी स्विस फ्रँक म्हणजेच 6,625 कोटी रुपये होती. मात्र 2020 मध्ये ती रक्कम वाढून 20,700 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. Swiss banks climb to Rs 20,700 crore

2020 मधील सिक्युरिटीज, बॉण्ड्स आणि इतर वित्तीय उत्पादनांद्वारे होल्डिंगमधून ही वाढ झाली आहे. या रकमेमध्ये 13,500 कोटी रुपयांचे बॉन्ड, 4000 कोटींपेक्षा जास्त ग्राहकांची ठेव, इतर बँकांमार्फत 3100 कोटींपेक्षा जास्त रुपये, ट्रस्टद्वारे 16.5 कोटी रुपये आणि जवळपास 13,500 कोटी रुपयांचे बॉन्ड, सिक्योरिटीज संबंधित पर्यायांचा समावेश आहे.

स्विस बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांबाबतीत ब्रिटन सगळ्यात पाहिलं आहे. या बँकेत ब्रिटनमधील नागरिकांद्वारे ठेण्यात आलेले 377 अब्ज स्विस फ्रँक आहेत. तर अमेरिका दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील लोकांचे 152 अब्ज स्विस फ्रँक स्विस बँकेत जमा आहेत. स्विस बँकांमधील ठेवीदारांच्या बाबतीत भारताच्या ठेवी 51 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर भारत याबाबतीत पाकिस्तान, बांगलादेश सारख्या देशांपेक्षा पुढे आहे.

स्वीस बँकेने अमेरिका आणि ब्रिटन या देशांच्या ठेवीमध्ये घसरण झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान २०२० मध्ये बांगलादेशी व्यक्ती आणि उद्योग यांच्याकडे असलेली संपत्तीमध्ये सुद्धा घसरण झालेली पाहायला मिळते.

Updated : 18 Jun 2021 1:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top