Home > News Update > टोकिया ऑलिंपिक मध्ये बजरंग पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव, शुक्रवारी कांस्यपदकासाठी मॅटवर उतरणार

टोकिया ऑलिंपिक मध्ये बजरंग पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव, शुक्रवारी कांस्यपदकासाठी मॅटवर उतरणार

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय मल्ल बजरंग पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. अजरबैजानचा वर्ल्ड चॅम्पियन हाजी अलीयेबसोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीत बजरंगला १२-५ असा पराभव पत्करावा लागला.

टोकिया ऑलिंपिक मध्ये बजरंग पुनियाचा उपांत्य फेरीत पराभव, शुक्रवारी कांस्यपदकासाठी मॅटवर उतरणार
X

भारताने शुक्रवारची सुरूवात महिला हॉकी संघाच्या पराभवाने केल्यानंतर आणखी एक मोठा पराभव भारताला पत्करावा लागला आहे. कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात भारताचा आघाडीचा मल्ल बजरंग पुनियाचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्यामुळे अंतिम फेरीमध्ये काही तो पोहोचू शकला नाही आहे. बजरंग कडून भारतीय चाहत्यांना सुवर्णपदकाची आशा होती. अझरबैजानचा हाजी अलीयेब याने बजरंग पुनियाला १२-५ च्या फरकाने मात दिली. उपांत्य फेरीत जरी बजरंगचा पराभव झाला असला तरी बजरंगकडे अजूनही कांस्य पदक पटकावण्याची संधी आहे. त्यामुळे भारताला त्याच्याकडून आता कांस्यपदकाच्या आशा आहेत.

तर शुक्रवारी फक्त बजरंगच नाही तर भालाफेकीत निरज चोप्राकडून देखील सुवर्णपदकाच्या आशा असणार आहेत. त्यामुळे ऑलिंपिक २०२० च्या शेवटच्या दिवशी पदक मिळणार का? याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.

Updated : 6 Aug 2021 5:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top