Home > News Update > इंडियन ऑइलने केली व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

इंडियन ऑइलने केली व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

नवीन वर्षात इंडियन ऑइलने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

इंडियन ऑइलने केली व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची कपात
X

मुंबई // नवीन वर्षात इंडियन ऑइलने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. डिसेंबर महिन्यामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळाला आहे.

नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजीच्या १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आयओसीएलच्या मते, १ जानेवारी २०२२ पासून मुंबईतील व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १०० रुपयांपेक्षा जास्तने कमी होऊन १९४८.५० पर्यंत खाली आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईकरांना १९ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी २०५१ रुपये मोजावे लागत होते. चेन्नईत आता १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी २१३१ रुपये, दिल्लीत १९९८.५ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान नवीन किंमती जाहीर झाल्यानंतर, कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी २०७६ रुपये मोजावे लागणार आहे.

नवीन वर्षात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळेच मुंबईत राहणाऱ्या लोकांना घरगुती गॅस सिलेंडर ९०० रुपयांना अनुदानाशिवाय मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये ९००, कोलकातामध्ये ९२६, चेन्नईमध्ये ९१६, लखनऊमध्ये ९३८, पटनामध्ये ९९८ रुपयांना मिळणार आहे.

Updated : 1 Jan 2022 9:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top