बार्शीच्या तरुणाने Facebook, Instagram मधील बग शोधला, फेसबूकने जाहीर केलं 22 लाखांचं बक्षीस
X
भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबूक किती सुरक्षित आहे. हे आपल्याला माहिती आहे काय? जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगारी वृत्तीचे हॅकर्स बसले आहेत.
ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे या विद्यार्थ्याने शोधून काढली आहे. फेसबूक आणि इन्स्टाग्राममध्ये एक बग घुसला होता. हा बग मयूरने शोधून हॅकर्सच्या हातात लोकांची माहिती जाण्यापासून वाचवले आहे. त्याची दखल फेसबुकने घेतली असून मयूरच्या या कामानिमित्त फेसबूकने मयूरला 22 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेलही त्याला पाठवला आहे.
मयूर फरताडे याने बग शोधून अनेक वापरकर्त्यांचा डाटा चोरण्यापासून फेसबूकला वाचविले. इन्स्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते.
यासाठी त्या युजरला फॉलो करणे गरजेचे नव्हते. फेसबूक व इन्स्टाग्रामलासुद्धा या बगची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकचा बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून शोधला आणि १६ एप्रिलला याची माहिती संबंधीत कंपनीला कळवले होते. त्यानंतर कंपनीने १५ जूनला ही चूक दुरुस्त केली आहे.