Home > News Update > भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन
X

भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. 1961 मध्ये सुरु झालेला अर्जुन पुरस्कार पहिल्यांदा प्राप्त करण्याचा मान नंदू नाटेकर यांना प्राप्त झाला होता. ते 88 वर्षांचे होते. पुणे येथे त्यांचं निधन झालं.




बॅडमिंटनमध्ये त्यांनी भाराताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले होते . आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे ते पहिले बॅडमिंटनपटू अशी त्यांची ओळख बनली होती . तसेच भारत सरकारच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले क्रीडापटू होते.

Updated : 28 July 2021 10:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top