Home > News Update > टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवला.

भारतील पुरूष हॉकी संघाने जर्मनीच्या संघाचा 5-4 ने पराभव करत ऑलिम्पिक्समध्ये कांस्यपदकाची कमाई केली. भारतीय संघावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवला.
X

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. हॉकी संघाने उकृष्ठ कामगिरी करत तमाम भारतवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतील पुरूष हॉकी संघाने जर्मनीच्या संघाचा 5-4 ने पराभव करत ऑलिम्पिक्समध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.

या विजयानंतर भारतीय संघाने तब्बल 41 वर्षांनंतर या स्पर्धेत पदक पटकावले आहे. या आधी 1980 साली भारतीय संघानं पदक जिंकलं होतं. त्यानंतर तब्बल चार दशकानंतर भारताला कांस्य पदक पटकावण्यात यश आलं आहे. या सामान्यामध्ये भारतीय हॉकी संघांचे सुरुवातीपासून जर्मनीच्या संघावर वर्चस्व पाहायला मिळालं. भारतीय संघाने 5-3 अशी आघाडी घेतल्यानंतर. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. आणि 31 व्या मिनिटाला चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंग यांनी पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर करत जोरदार कामगिरी केली.

मात्र, चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनी संघाने जोरदार सुरूवात केलेली पाहायला मिळाली. जर्मनीने 48 व्या मिनिटाला चौथा गोल केला. त्यामुळे भारतीय संघाची आघाडी कमी झाली होती. मात्र, पुन्हा भारताने आघाडी घेत जर्मनी संघाला 5-4 ने पराभूत केले. आणि पुरुष हॉकी संघाच्या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

भारतीय संघाच्या या दमदार कामगिरीनंतर संपुर्ण देशात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 'कांस्य नहीं, ये तो गोल्ड है' असा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर येतांना पाहायला मिळत आहेत. 41 वर्षानंतर पदक मिळवल्यानंतर भारतीय संघाचे देशभरातून कौतुक होत आहे.

Updated : 5 Aug 2021 11:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top