Home > News Update > India VS Pakistan : विजयानंतर जय शहांनी तिरंगा पकडण्यास नकार दिल्याचा Video Viral

India VS Pakistan : विजयानंतर जय शहांनी तिरंगा पकडण्यास नकार दिल्याचा Video Viral

आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरोधातील सलामीचा सामना जिंकल्यानंतर BCCI चे सचिव जय शाह यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

India VS Pakistan : विजयानंतर जय शहांनी तिरंगा पकडण्यास नकार दिल्याचा Video Viral
X

आशिया चषक स्पर्धेत रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानला धुळ चारत पाच गडी राखून सामना जिंकला. मात्र या विजयानंतर भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र यावेळी BCCI चे सचिव जय शाह यांनी हातात तिरंगा पकडण्यास नकार दिल्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्याने जय शाह चांगलेच वादात सापडले आहेत.

भारत विरुध्द पाकिस्तान सामना पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र BCCI चे सचिव जय शाह उपस्थित होते. यावेळी जय शाह यांच्यासोबत स्थानिक अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान सामना सुरू असताना जय शाह आनंद व्यक्त करत होते. त्यातच हार्दिक पंड्याने विजयी षटकार मारल्यानंतर जय शाह टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होते. मात्र त्यावेळी एका अधिकाऱ्याने जय शाह यांच्या हाती तिरंगा देण्याचा प्रयत्न केला. परंतू जय शाह यांनी नो नो म्हणत तिरंगा घेण्यास नकार दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जय शाह यांनी तिरंगा हाती घेण्यास नकार देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीचे सोशल मीडिया प्रमुख कृष्णन यांनी नाराजी व्यक्त करत जय शाह यांच्यावर टीकास्र सोडले.

जर ही गोष्ट भाजपशी संबंधीत असलेल्या व्यक्तींनी केली असती तर भाजपच्या आयटी सेलने त्यांना देशद्रोही ठरवले असते आणि गोदी मीडियाने त्यावर मोठ्या डिबेट घेतल्या असत्या. मात्र लकीली ते शहेनशाह सन जय शहा आहेत.

तेलंगणा राष्ट्र समितीच्या इतर सोशल मीडिया टीममधील नेत्यांनीही जय शाह यांच्यावर टीका केली आहे. तर वायएसआर नावाच्या ट्वीटर हँडलवरून जय शाह यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असल्याचे म्हटले आहे.

जय शाह यांनी तिरंगा पकडण्यास का नकार दिला? त्याचे नेमके कारण काय? यासंदर्भात जय शाह यांनी अजून कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र जय शाह यांच्या कृतीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

Updated : 29 Aug 2022 9:30 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top