१९९९ पासून एक्झिट पोलचे अंदाज चुकत आहेत - व्यंकय्या नायडू
Max Maharashtra | 20 May 2019 1:29 PM IST
X
X
लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर आलेल्या सर्व एक्झिट पोलने एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, उपराष्ट्रपती आणि भाजपचे माजी नेते असलेल्या व्यंकय्या नायडू यांनी एक्झिट पोलच्या अंदाजावर वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
'१९९९ पासून जाहीर झालेले एक्झिट पोल चुकीचे ठरत गेले आहेत. २३ मेला जाहीर होणारे निकाल याहून वेगळे असू शकतात. प्रत्येक पक्षाला आपणच जिंकू अशी आशा वाटत असते. त्यामुळे निकालाच्या दिवशी प्रत्येक पक्ष आपणच जिंकू असा आत्मविश्वासही व्यक्त करत असतो. मात्र, या विश्वासाला काहीच आधार नसतो. त्यामुळे खरा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच लागेल असं मानणं चुकीचं आहे. देशात कोण सत्तेत येईल हे मला माहित नाही. कोणी यावे याबद्दल मी बोलणार नाही. पण आज देशाला एका स्थिर सरकारची आणि शक्तीशाली नेत्याची नितांत गरज आहे.'
असं म्हणत व्यंकय्या नायडू यांनी एक्झिट पोलच्या आकड्यांवर शंका घेत एक्झिट पोल्सने दिलेल्या कलाला निकाल म्हणून पाहता येणार नाही. असा सूचक इशारा दिला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर या ठिकाणी ते एका अनौपचारिक बैठकीत बोलत होते. यावेळी कार्य़कर्त्यांनी एक्झिट पोल एनडीए च्या बाजूने असल्याचं नायडू यांना सांगितले. त्यानंतर नायडू यांनी एक्झिट पोलवर शंका उपस्थित केली.
Updated : 20 May 2019 1:29 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire