Home > News Update > भारत हा तिरस्कार करणारा नाही, तर प्रेम वाढवणारा देश आहे - राहूल गांधी

भारत हा तिरस्कार करणारा नाही, तर प्रेम वाढवणारा देश आहे - राहूल गांधी

भारत हा तिरस्कार करणारा नाही, तर प्रेम वाढवणारा देश आहे - राहूल गांधी
X

काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज शेवट असून या यात्रेची दादरच्या शिवाजी पार्कवर भव्य समारोप सभा आयोजित करण्यात आली.

भारत हा तिरस्कार करणारा देश नाही तर प्रेम वाढवणारा देश आहे. मग या देशात तिरस्कार पसरवण्याचं काय कारण आहे याविषयी बोलताना गांधी म्हणाले की, या देशात शेतकऱ्यांवर, दलित, गरीब, कामगार यांच्यावर होत असलेल्या वाढत्या अन्यायामुळे या देशात तिरस्कार पसरवला जात आहे.

दरम्यान राहूल गांधीने भाजपवर कडाडून टीका केली आहे, ते म्हणाले की भाजप हा वर्चस्व गाजवणारा पक्ष आहे तो शेतकऱ्याला मुर्ख समजतो, बेरोजगार तरूणांना काही कळत नाही असं समजतो, पण जेवढं एखाद्या शास्ञज्ञाकडे ज्ञान आहे तेवढंच ज्ञान या देशातल्या सामान्य शेतकऱ्याकडे आहे फक्त त्याच्या हुशारीची पध्दत वेगळी आहे. भाजपचा हा वर्चस्ववाद आम्ही मोडून काढू आणि या देशात सगळे समान आहेत हे दाखवून देऊ, असं राहूल गांधी म्हणाले.

Updated : 17 March 2024 10:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top