समुद्राच्या वाढत्या पातळीचा देशातील १२ शहरांना धोका
X
भारतातील १२ शहरे पाण्याखाली जाण्याचा अंदाज नासाकडून वर्तवला जात आहे. मुंबईसह अनेक शहरानां याचा धक्का बसणार असल्याच सांगीतल जात आहे. यामुळे जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीने आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे देण्यात आला आहे.
तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढणार असल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे या शतका अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह 12 शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. यावेळी ही शहरे 3 फूट पाण्यात असतील, असे सांगण्यात आले आहे. 2006 ते 2018 या कालावधीत जागतिक समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे 3.7 मिलीमीटर दराने वाढत आहे.
अंतराळ संशोधन संस्था नासाने आयपीसीसीच्या अहवालाचे मूल्यांकन केले आहे. त्यानंतर भारतातील 12 शहरात पाण्याची पातळी वाढ होण्याची शक्यता असतल्याच सांगण्यात आल आहे. तसेच याआधी जागतिक हवामानात असे बदल होत होते. मात्र 2050 नंतर दर सहा ते नऊ वर्षांनी असे बदल दिसतील असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 21 व्या शतकात समुद्राच्या पातळीत सतत वाढ होताना दिसेल. त्यामुळे समुद्राजवळील सखल भागात पाणी येण्याच्या घटना वाढण्याचा धोका अधिक आहे.
कोणत्या शहराला किती असणार धोका
भावनगर 2.70 फूट
कोचिन 2.32 फूट
मोरमोगाओ- 2.06 फूट
ओखा- 1.96 फूट
पारादीप- 1.93 फूट
मुंबई - 1.90 फूट
तुतीकोरीन- 1.90 फूट
कांडला- 1.87 फूट
मँगलोर- 1.87 फूट
चेन्नई - 1.87
विशाखापट्टण 1.77 फूट
खिडीरपूर 0.49 फूट