Home > News Update > जिथे पूरपरिस्थिती तिथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढवणार

जिथे पूरपरिस्थिती तिथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढवणार

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर या परिस्थितीचा परिणाम होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जिथे पूरपरिस्थिती तिथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढवणार
X

राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा वाढतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाला आहे. अशात कोरोना लसीकरणावर याचा परिणाम होऊ नये यासाठी जिथे जिथे पूरस्थिती असेल, तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ते पुण्यामध्ये बोलत होते. दरम्यान राज्याला पाच दिवसांत किमान दहा लाख लस मिळते. ती रोज मिळायला हवी. आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

ज्या भागात पूरपरिस्थिती आहे अशा भागात लसीकरण करा अशा सुचना देण्यात आल्यात. सोबतच अशा भागात आरोग्य युनिट तयार करण्यात आलेत. सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार योजना केल्या जातात अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

...तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शाळा सुरू करू – आरोग्यमंत्री टोपे

दरम्यान केंद्राकडून मिळणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसींचा राज्याकडून तातडीने पुरवठा केला जातो. केंद्राच्या धोरणाप्रमाणे राज्याला लस मिळते. आयसीएमआरच्या नियमांचे राज्याकडून तंतोतंत पालन केले जात असल्याचं टोपे यांनी म्हटले आहे. आयसीएमआरकडून जर शाळा सुरू करण्याच्या सुचना मिळाल्या तर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून निर्णय घेऊ, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मागील काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी मृत्यू प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना "महाराष्ट्रात ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू नाही देशात असं काही बोललं जातंय, पण इतर राज्यात अशा केसेस असतील , ऑक्सिजनलिकेजमुळे अशा केसेस झाल्या असतील", असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय.

Updated : 23 July 2021 1:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top