International Nurse day : आरोग्यसेवेतील मनुष्य बळ वाढवा, परिचारिकांची सरकारकडे मागणी
X
आज फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. फ्लोरेन्स ब्रिटिश तरुणीने सर्वात प्रथम परिचारिका सेवेचे महत्त्व युद्ध काळात त्यांनी सैनिकांची जी सेवा केली. त्यातून जगासमोर आणली. त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' या पदवीने सन्मानित केले गेलं. म्हणून त्यांचा जन्म दिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
रुग्ण सेवा हाच परिचारिकेचा धर्म... या धर्माचे तंतोतंत पालन करणाऱ्या परिचारिकांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो. जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरातील अनेक छोट्या-मोठ्या रुग्णालयात परिचारिकांचा सन्मान केला जातो.
गेल्या दीड वर्षांपासून जगावर आलेल्या महामारीचा सामना 24 तास या परिचारिका करत आहेत. या काळात अनेक परिचारिका करोना बाधित झाल्या... आणि पुन्हा बऱ्या होऊन सेवेमध्ये देखील दाखल पण झाल्या.
कोरोना काळात परिचारिका खऱ्या अर्थाने देवदूतच ठरल्या. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करसपॉन्डंट किरण सोनावणे यांनी उल्हासनगर येथील रुग्णालयात जाऊन तेथील नर्सेसचा अनुभव आणि व्यथा जाणून घेतल्या. यावेळी या परिचारिकांनी महाराष्ट्र शासनाने आरोग्य सेवेतील मनुष्यबळ वाढवण्याची मागणी केली आहे.
त्या सांगतात की, कोरोना महामारीचा सामना रुग्णांसह रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या नर्सेस, डॉक्टर, वॉडबाय इ. लोकांनाही करावा लागला आहे. त्यामुळे एक नर्स जरी कोरोना बाधित झाली तरी त्यांच्या कामाचा भार हा इतर कर्मचाऱ्यांवर येतो परिणामी 24 तास ड्युटी करावी लागते. घरी जाण्यासाठी ही सुट्टी मिळत नाही. तसेच एखाद दिवशी सुट्टी कशी घ्यावी असा प्रश्न ही पडतो. अपुरा मनुष्यबळ असल्यामुळे या महामारीचा सामना करताना अनेक अडचणी येतात. सोबतचं घरातल्यांना वेळही देता येत नाही. त्यामुळे सरकारने आरोग्य सेवेतील मनुष्यबळ वाढवावे अशी मागणी आम्ही सर्वजण करत असल्याचं तेथील नर्सेसने सांगितलं.