Home > News Update > न्युजक्लिक, न्युज लॉंड्रीवर आयकर विभागाच्या धाडी....

न्युजक्लिक, न्युज लॉंड्रीवर आयकर विभागाच्या धाडी....

दिल्लीमधील एका खळबळजक घडामोडींमधे ऑनलाईन न्युज पोर्टल असलेल्या न्युजक्लिक (newsclick) आणि न्युजलॉंड्रीवर (newsclick) आज सकाळी आयकर विभागाने (income tax department) धाडी घातल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात सक्तवसुली संचलनालयाने (ED) दोन्ही पोर्टलची कार्यालये आणि संपादकाच्या घरांवर धाडी टाकल्या होत्या.

न्युजक्लिक, न्युज लॉंड्रीवर आयकर विभागाच्या धाडी....
X

दक्षिण दिल्लीमधे असलेल्या न्युजक्लिक (newsclick) आणि न्युजलॉंड्रीच्या (newslaudry) कार्यालयांना आज सकाळपासून आयकर विभागाने धाडसत्र सुरु केलं. आयकर अधिकाऱ्यांनी कार्यालयांमधे प्रवेश करतात सर्व पत्रकार आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले. त्यामुळे अनेकांचा इतरांची संपर्क होऊ शकला नाही. घरातून काम करणारे पोर्टलचे कर्मचारी कार्यालयात संपर्क करत होते. परंतू तिथेही संपर्क होऊ शकला नाही.

न्युजलॉंड्रीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, दुपारी १२ च्या दरम्यान आयकर विभागाच्या ६-७ लोकांनी ऑफीसचा ताबा घेतला. अजून कार्यालयामधे कागदपत्रांची तपासणी सुरु आहे.



न्युजलॉंड्री या न्युजपोर्टलला प्रथमच केंद्रीय तपासस्थेच्या कारवाईला सामोरे जावं लागलं आहे. कारण मागील फेब्रुवारी महीन्यात न्युजक्लिकच्या संपादक आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाने (ED) धाडी टाकल्या होत्या. पैशांचा अपहार आणि परदेशी देणगीदारांबाबत ईडी चौकशी करत असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. न्युजक्विकने याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत ईडीच्या (ED)कारवाईवर स्थगिती मिळवली होती.


अनेक पत्रकारांच्या संघटना आणि माध्यमांनी या कारवाईचा निषेध केला आहे. जे पत्रकार सत्तेपुढं झुकत नाही अशा पत्रकारांवर अंकुश ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.


न्युजक्लिक (newsclick) आणि न्युजलॉंड्रीवर (newsclick)ने कोविड -१९ महामारी, शेतकरी आंदोलनामधे मोठ्या प्रमाणात कव्हरेज करण्यात आले होते.

दुसऱ्या कोरोना लाटेतील दुर्दशा मांडल्यानंतर भास्कर ग्रुपच्या भास्कर समाचार चॅनेलवर देखील अशाच पध्दतीने केंद्रीय तपास संस्थांनी कारवाई केली होती.

Updated : 10 Sept 2021 4:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top