Home > News Update > अहमदनगर: आगीच्या घटनेची चौकशी करावी; मंत्र्यांसह विरोधीपक्ष नेत्यांची मागणी

अहमदनगर: आगीच्या घटनेची चौकशी करावी; मंत्र्यांसह विरोधीपक्ष नेत्यांची मागणी

अहमदनगर: आगीच्या घटनेची चौकशी करावी; मंत्र्यांसह विरोधीपक्ष नेत्यांची मागणी
X

जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचा आज सकाळी आग लागली. या विभागात एकूण 17 रुग्ण होते. यात सुमारे 10 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.

या घटनेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, नगर सिव्हिल हॉस्पिटल आयसीयूमध्ये आगीच्या दुर्घटनेत १० व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर जखमींवरील उपचारांसाठी तातडीने योग्य ती मदत करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. मृतांच्या आप्तपरिवाराच्या दुःखात आम्ही सहसंवेदना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो!

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागून १० जणांच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. पीडित कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी असून, संबंधित यंत्रणेने या घटनेची सखोल चौकशी करावी.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींविरुद्ध कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

Updated : 6 Nov 2021 3:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top