धक्कादायक ! भाजपला मतदान केलं ते बोटच कापलं
X
एकीकडे राज्यात राजकीय धामधूम सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला भाजपला मतदान केलं ते बोटचं कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका बाजूला राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला पोलिस यंत्रणा सर्वसामान्यांची दखल घेत नाही. त्यामुळे ज्या बोटाने भाजपला मतदान केलं, ते बोटचं कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यात घडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक असलेल्या नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्ट रोजी आपल्या पत्नीसह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला. ज्यामध्ये नंदकुमार ननावरे यांनी आपल्याला काही लोक त्रास देत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सातारा येथे राहणाऱ्या संग्राम निकाळजेसह पाच जणांवर उल्हासनगर विठ्ठलवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा गुन्हा आता खंडणी पथकाकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा पाठपुरावा नंदकुमार यांचा भाऊ धनंजय करीत होता. मात्र पोलिस अधिकारी संथ गतीने तपास करत असून योग्य उत्तरंही देत नसल्याचा आरोप करत संतापलेल्या धनंजय ननावरे यांनी ज्या बोटाने भाजपला मतदान केलं होतं. ते बोटच सुऱ्याने कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एवढंच नाही तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दर आठवड्याला शरीराचा एक भाग कापून पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे.
धनंजय ननावरे यांनी भाजपला मतदान केलेलं हाताचं बोट कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.