Home > News Update > त्रिपुरात विधानसभा पोटनिवडणूकीत दोन्ही जागा भाजपच्या खिशात

त्रिपुरात विधानसभा पोटनिवडणूकीत दोन्ही जागा भाजपच्या खिशात

त्रिपुरात विधानसभा पोटनिवडणूकीत दोन्ही जागा भाजपच्या खिशात
X

देशात सहा राज्यांच्या विधानसभांसाठी पोटनिवडणूक झाली. त्याची आज मतमोजणी सुरु आहे. यामध्ये त्रिपुरात भाजपने आपला डंका कायम वाजवत ठेवला आहे.

उत्तरप्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये 7 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणूकीची आज मतमोजणी सुरु आहे. त्यापैकी त्रिपुरातील दोन्ही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये भाजपने त्रिपुरातील दोन्ही जागा जिंकल्या आहेत.

त्रिपुरातील बोक्सानगर या मतदारसंघातून भाजपचे तफजल हुसैन हे 30 हजार 237 मतांनी निवडून आले आहेत. तसेच त्रिपुरातील धनपुर येथून बिंदू देबनाथ यांनी 18 हजार 871 मतांनी निवडून आले आहेत.

उत्तराखंडमध्ये दुपारी 1.18 पर्यंत ऑल झारखंड स्टुडन्ट युनियनच्या यशोदा देवी या पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे केरळमधील पुथूपल्ली येथून काँग्रेसचे ओमान चंडी, उत्तर प्रदेशमधून समाजवादी पक्षाचे सुधाकर सिंह, उत्तराखंडमधील बागेश्वर येथून पार्वती दास आणि धुपगुरी येथून तृणमुल काँग्रेसचे निर्मलचंद्र रॉय हे आघाडीवर आहेत.

त्यामुळे पोटनिवडणूकीत दोन जागांवर भाजपचा विजय तर एक ठिकाणी आघाडीवर, त्याबरोबरच तीन ठिकाणी इंडिया आघाडीतीतील उमेदवार तर एक ठिकाणी ऑल झारखंड स्टुडंट युनियन चे उमेदवार आघाडीवर आहेत.

Updated : 8 Sept 2023 1:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top