`त्या`नव्या कोरोना स्ट्रेनचे महाराष्ट्रात आठ रुग्ण
X
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली होती. खबरदारी म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे.आता महाराष्ट्रातही करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
आयसीएमआरनं म्हटलं होतं की, ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूच्या नव्या प्रकाराचं भारताने यशस्वीरित्या 'कल्चर' केलं आहे. 'कल्चर' ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पेशी नियंत्रित परिस्थितीत तयार केल्या जातात. विशेषतः त्यांच्या नैसर्गिक वातावरणाबाहेर ही प्रक्रिया केली जाते. राज्यात (3 जानेवारी) 3 हजार 282 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबईत आज फक्त 581 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर केवळ 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
मार्च-एप्रिल या कोरोनाच्या महिन्यानंतर मुंबईत प्रथमच सर्वात कमी मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.