Home > News Update > औरंगाबादेतही महिला पोलिसांना आठ तासांचीच ड्युटी करावी लागणार

औरंगाबादेतही महिला पोलिसांना आठ तासांचीच ड्युटी करावी लागणार

मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता औरंगाबादमधील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्यात आलेत. औरंगाबादेत आता महिला पोलिसांना आठ तासांचीच ड्युटी करावी लागणार आहे

औरंगाबादेतही महिला पोलिसांना आठ तासांचीच ड्युटी करावी लागणार
X

औरंगाबाद// मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता औरंगाबादमधील महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्यात आलेत. औरंगाबादेत आता महिला पोलिसांना आठ तासांचीच ड्युटी करावी लागणार आहे. कौटुंबिक आणि कार्यालयीन जबाबदाऱ्यांचा मेळ घालण्यासाठी राज्यातील महिला पोलिसांच्या ड्युटीचे तास 8 तासच करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. याआधी महिला पोलिसांना 12 तासांची ड्युटी करावी लागत होती. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने याबाबत आदेश काढले होते. त्याची अंमलबजावणी औरंगाबादेत तीन महिने उशीराने केली जात आहे. कालपासून या आदेशाची अंमलबजावणी औरंगबादेत करण्यात आली आहे, याबाबतचे आदेश नुकतेच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी काढलेत

महिला पोलिसांना दैनंदिन काम, गंभीर गुन्ह्यांच्या तपासाबाबत अनेक वेळा ज्यादा तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर परिणाम होतात, त्यामुळे महिला पोलिसांना आठ तासांच्या ड्युटीचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू केला होता. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी इतर घटकांनीही हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी तर राज्यात सर्वत्र हा नियम लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले.

Updated : 22 Dec 2021 7:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top