सरकार पाडण्यासाठी काही लोक गांजा मारुन काम करत आहेत: संजय राऊत
X
आर्यन खान प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आज या सर्व प्रकरणाला वेगळं वळण लागलं. आर्यन खान केस प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी चा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला आहे.
त्यानंतर आता या सर्व प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घ्यावी. असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते. सरकार पाडण्यासाठी काही लोकं गांजा मारून काम करत असले तरी आम्ही शुद्धीत आहोत. हा पकडलेला गांजा असतो एनसीबी त्यांना पुरवत असेल आणि त्या गांजाच्या नशेत कोणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर नशेत ते पडतील सरकार पडणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर आरोपींना पकडण्यात आल्यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. आता किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईलनं एका व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे.
क्रूझवरील छाप्यावेळी २ ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, आसा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक १ चा साक्षीदार आहे.
प्रभाकर साईल ने केलेल्या या दाव्यानंतर संजय राऊत आता आक्रमक झाले आहेत. मुंबई महाराष्ट्रात एनसीबी फारच कामाला लागली आहे. जणू काही मुंबई-महाराष्ट्रात अफगाणिस्तान, पाकिस्तानप्रमाणे गच्चीवर, घरातघरात, बाल्कनीत चरस-गांजाचे पिके काढतात, या राज्याचे लोकं अफू-गाजांचा व्यापार करतात, अशी एक बदनामी देशभरात सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्यूमोटो घेऊन या प्रकरणी कारवाई केली पाहिजे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणीचं संजय राऊत यांनी केली आहे.
Witnes in #AryanKhan case made to sign on blank paper by NCB is shocking. Also thr r reports that thr ws demnd of huge money .CM UddhavThackeray said tht ths cases r made 2 defame Mah'shtra.Ths seems 2b comng tru @Dwalsepatil
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 24, 2021
Police shd tk suo moto cognizance@CMOMaharashtra pic.twitter.com/zipBcZiRSm