Rain Update : सावधान ! 'या' जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
X
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने आणखी एक इशारा दिला आहे.
Rain Alert : राज्यात दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिकसह (Nashik rain), सोलापूर (Solapur Rain), अहमदनगर (Ahmednagar Rain), सांगली (Sangli Rain), बुलढाणा (Buldhana Rain), नागपूर (Nagpur Rain) जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यातच आज आणखी हवामान विभागाने जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या मुंबई विभागाने सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी प्रसिध्द केलेल्या बुलेटीननुसार अहमदनगर, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Rain with lightning) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याबरोबरच यावेळी वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किलोमीटर असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.