Home > News Update > मुंबई पोलिसांकडून आप नेते आणि कार्यकर्त्यांना बेकायदेशीर अटक

मुंबई पोलिसांकडून आप नेते आणि कार्यकर्त्यांना बेकायदेशीर अटक

मुंबई पोलिसांकडून आप नेते आणि कार्यकर्त्यांना बेकायदेशीर अटक
X

कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील आम आदमी पार्टी नेते कार्यकर्ते यांनी तीव्र निषेध केला आहे. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात शांततापूर्ण निषेध करताना आम आदमी पार्टीचे नेते, स्वयंसेवक आणि सदस्यांविरुद्ध पोलिसांनी क्रूर आणि अन्यायकारक कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पार्टी कडून करण्यात आला आहे.




आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या नेतृत्वाखाली, AAP च्या सदस्यांनी आणि नेत्यांनी 21/03/2024 रोजी संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांच्या चुकीच्या नजरकैदेच्या विरोधात निषेध करण्याचा लोकशाही अधिकार वापरला आहे. दरम्यान प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की "मुंबई पोलिसांनी कायदा पाळण्याऐवजी आमच्या शांततापूर्ण आंदोलकांची मनमानी अटक आणि छळ सुरू केला. निदर्शनादरम्यान अनेक आप सदस्यांना पोलिस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केली. आपचे नेते अस्लम मर्चंट यांच्या नाकावर इन्स्पेक्टरने ठोसा मारला, त्यामुळे गंभीर रक्तस्त्राव झाला. शिवाय, आम आदमीच्या सदस्यांना पोलिस स्टेशनमधून पोलिस स्टेशनमध्ये हलवण्यात आले आणि शेवटी लाईट, पंखे, खुर्च्या किंवा टॉयलेट यांसारख्या पुरेशा सुविधांशिवाय आझाद मैदानात पाठवण्यात आले. आम्ही बेंचवर बसण्याची मागणी करत असतानाही गैरवर्तन सुरूच होते" एक मद्यधुंद पोलिस (बेल्ट नं.: 061919) विशाल कासार यांनी मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांना जमिनीवर ढकलले असल्याचं सांगण्यात आलं आहे.




या गोंधळात आपच्या महिला नेत्या नीता सुखटणकर यांचे कपडे फाटले. शिवाय, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीदरम्यान, बीपी डेटाची योग्य तपासणी न करता नोंद करण्यात आली आणि त्यावर आक्षेप घेतल्यावर, पुरावे महिला कॉन्स्टेबलने फाडले. सध्या, आपचे दहा नेते एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये नजरकैदेत आहेत, सकाळी 11 वाजता माझगाव कोर्ट रूम क्र. 38 मध्ये स्थानांतरित होण्याची होण्याची शक्यता आहे. आज सकाळी त्यांची बाजू ॲड संदीप कटके न्यायालयात मांडणार आहेत.

"आम्ही विशाल कासार (बेल्ट क्रमांक: 061919) यांच्यावर त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी करतो, ज्यात ड्युटीवर मद्यपान करून महिला नेत्यांवर हल्ला केलाचा आरोप करण्यात आला आहे. आम्ही अधिकाऱ्यांना न्याय आणि जबाबदारीची तत्त्वे कायम ठेवण्याचे आवाहन करतो ज्याणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही." असं आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या आहेत.


Updated : 22 March 2024 1:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top