शास्त्र असते ते? इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात ज्योतिषशास्त्र शिकवले जाणार
X
ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही यावर अजूनही वाद कायम असताना आता ज्योतिषशास्त्राचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNU) हा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. डिग्रीधारक व्यक्तीला हा कोर्स करता येणार आहे. दोन वर्षांचा हा कोर्स सध्या ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची भाषा ही हिंदी असेल. विद्यापीठाच्या देशभरातील विविध केंद्रांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.
मुळात ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही यावरच देशात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत याआधी ज्योतिषशास्त्राच्या समावेश अभ्यासक्रमात करण्याचे प्रयत्न झाले होते पण देशातील शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लोकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केल्यानंतर ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला नव्हता पण आता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने हा निर्णय घेतलेला आहे यावरून देशात आता नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे.