Home > News Update > अज्ञानी कट्टरपंथी लोक लक्षद्वीपला बरबाद करत आहेत, राहुल गांधी भाजपवर का भडकले?

अज्ञानी कट्टरपंथी लोक लक्षद्वीपला बरबाद करत आहेत, राहुल गांधी भाजपवर का भडकले?

अज्ञानी कट्टरपंथी लोक लक्षद्वीपला बरबाद करत आहेत, राहुल गांधी भाजपवर का भडकले?
X

लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशावरुन आता राजकारण तापलं आहे. केंद्रशासीत प्रदेशाचे प्रशासक असलेल्या प्रफुल पटेल यांच्या कामावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी लक्षद्वीपला सत्तेत असलेले अज्ञानी कट्टरपंथी लोक नष्ट करू पाहात आहेत. मी लक्षद्वीपच्या जनतेसोबत उभा आहे. असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात...

'लक्षद्वीप समुद्रातील भारताचं आभुषण आहे. सत्तेत असलेल्या अज्ञानी कट्टरपंथी हे नष्ट करू पाहात आहेत. मी लक्षद्वीपच्या जनतेसोबत उभा आहे"

असं राहुल यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वांद्रा यांनीसुद्धा लक्षद्वीप संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपण लक्षद्वीपच्या जनतेसोबत आहोत. असं ट्वीट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

केंद्रशासीत प्रदेश असणाऱ्या लक्षद्वीपमध्ये ९० टक्के जनता ही मुस्लिम आहे. आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल पटेल यांनी गोमांसावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडल्याने लोकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. तसंच ज्या व्यक्तीला दोनपेक्षा अधिक मुलं असतील अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही. असा नियमाचा मसूदा प्रफुल पटेल यांनी तयार केला आहे. या मसुद्याला जनतेने विरोध केला आहे.


अज्ञानी कट्टरपंथी लोक लक्षद्वीपला बरबाद करत आहेत, राहुल गांधी भाजपवर का भडकले?

Ignorant bigots in power destroying Lakshadweep: Rahul Gandhi

केंद्रशासीत प्रदेश लक्षद्वीपमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यास दोषीला १० ते ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि ५ ते १ लाखांपर्यंत दंड केला जाऊ शकतो. त्यामुळे आता हा नवीन मसुदा जर मंजूर झाला तर लक्षद्वीपमधील व्यक्तीकडं गोमांस आणि गोमांस कोणतीही वस्तू आढळल्यास कारवाई होऊ शकते.

दरम्यान कॉंग्रेसने या सर्व प्रकरणावरुन आक्रमक भूमिका घेतली असून केंद्रशासीत प्रदेशाचे प्रशासक असलेल्या प्रफुल पटेल यांना परत बोलावण्यात यावं. अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे.

Updated : 26 May 2021 11:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top