Home > News Update > पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट राज्य सरकार कमी करत नसेल तर 'हे' करा ; केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलं मत

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट राज्य सरकार कमी करत नसेल तर 'हे' करा ; केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलं मत

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट राज्य सरकार कमी करत नसेल तर हे करा ; केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलं मत
X

नवी दिल्ली : ज्या राज्यांत सरकारने इंधनाचे दर कमी केलेले नाहीत तेथील जनतेने सरकारला जाब विचारला पाहिजे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतरही काही राज्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केलेला नाही. याबाबत केंद्रीय मंत्री सीतारमण यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने आधीच राज्यांना आवाहन केलं आहे, आता त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांनी हे विचारण्याची वेळ आली आहे. त्या सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सोबतच त्या म्हणाल्या की, "पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये झालेल्या कपातीने होणारे महसुली नुकसान पूर्णपणे केंद्राला सहन करावे लागणार आहे. त्यामुळे राज्यांना मिळणाऱ्या महसुली हिश्श्यावर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्र सरकारने करकपात केली असून, व्हॅट कमी करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. असे सीतारमण म्हणाल्या.

Updated : 16 Nov 2021 10:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top