Home > News Update > ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर, आम्ही पहारेकरी आहोत: मंत्री वेडट्टीवार

ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर, आम्ही पहारेकरी आहोत: मंत्री वेडट्टीवार

कोणी ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर, आम्ही पहारेकरी आहोत. जागते रहो...असा इशारा देत एवढया मोठ्या जाती असताना आमची स्वतंत्र जनगणना का नाही? सर्वांची जनगणना होते तर ओबीसींची देखील जनगणना व्हावी असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले ते ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसाठी आज जालन्यात काढण्यात आलेल्या मोर्चात बोलत होते.

ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर, आम्ही पहारेकरी आहोत: मंत्री वेडट्टीवार
X

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी गेली अनेक वर्ष केली जात आहे. त्यामुळे २०११ मध्ये होणाऱ्या जनागणनेत ओबीसी जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि त्यामध्ये ओबीसींचा

रकाना स्वतंत्र असला पाहिजे या मागणीसाठी ओबीसी समाज आता आक्रमक झाला आहे.ओबीसी समाजाची जातीनिहाय जनागणा झाली पाहिजे या मागणीसाठी आज जालनात मोर्चा काढण्यात आला. इतक्या मोठ्या जाती असताना आमची स्वतंत्र जनागणा का नाही? सर्वांची जनगणना होते तर ओबीसींची देखील जनगणना व्हावी हे केंद्र सरकारला माहीत व्हावं यासाठी ही ओबीसी शक्ती एकवटली असून एकतेचा संदेश घेऊन आपल्या हक्कासाठी न्यायासाठी ओबीसी समाज संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल असा इशारा वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी होत आहे. न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा आणि नाचीपनचा अहवाल स्वीकारून ओबीसीची टक्केवारी वाढवावी व सब कॅटेगिरी करून मराठा समाजाला वाढलेली टक्केवारी द्यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

गायकवाड समिती ही मागासवर्गीयांच्या आरक्षणाची समिती होती. या समितीचे गायकवाड हे प्रमुख असले तरी मागासवर्गीय आयोगावर मोठ्या संख्येने मागासवर्गीय नव्हते हा खरा मुद्दा आहे. गायकवाड समितीने निर्णय दिल्यानंतर SEBC मधून आरक्षण घेण्यास काही हरकत नसून यास कोणीही विरोध करणार नाही. पण काही विघ्नसंतोषी यास वेगळं वळण देण्याचं काम करत असतील तर आम्ही शक्तीनिशी एक आहोत असा प्रयत्न कोणी करू नये असा, इशारा वडेट्टीवार यांनी दिला.ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न होतोय का? असा प्रश विचारला असता वडेट्टीवार यांनी बाळासाहेब सराटे या व्यक्तीस सर्वेक्षणाचे काम देण्यात आलं होतं. या व्यक्तीच असं मत असल्याचं ते म्हणाले.

Updated : 24 Jan 2021 4:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top