Home > News Update > किल्ल्याचे बुरूज ढासळले तर..., मनसे नेते वसंत मोरेंचे ट्वीट चर्चेत

किल्ल्याचे बुरूज ढासळले तर..., मनसे नेते वसंत मोरेंचे ट्वीट चर्चेत

मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे पक्षात नाराजीचा सूर आहे. त्यातच पुणे शहरातील मनसेचे प्रमुख नेते असलेले वसंत मोरे यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

किल्ल्याचे बुरूज ढासळले तर..., मनसे नेते वसंत मोरेंचे ट्वीट चर्चेत
X

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray Speech) यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून वक्तव्य केले होते. त्यामध्ये जर सरकारने मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर हिंदूंनी त्यापेक्षा मोठ्या आवाजात मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठन करण्याचे आवाहन केले होते. त्यावरून मनसेतील खदखद समोर आली आहे.

राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर (Gudhipadva melava) दुसऱ्याच दिवशी त्या वक्तव्याचे पडसाद पुणे शहरात मनसेच्या मुस्लिम (Muslim ) पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे दिसून आले. त्यातच पुणे शहराचे वसंत मोरे यांनी आमच्या मतदारसंघात आम्ही मशिदींसमोर हनुमानचालिसा पठन करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राज ठाकरे यांच्या भुमिकेशी विसंगत भुमिका घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर त्यावर नाराजी व्यक्त करत वसंत मोरे यांनी राजीनामा दिलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर या भेटीचे फोटो ट्वीट करत वसंत मोरे यांनी किल्ल्याचे बुरूज ढासळले तर किल्ला ढासळायला वेळ लागत नसल्याचे सांगत राज ठाकरेंना इशारा दिला आहे.

वसंत मोरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासळायला लागले ना की किल्ला पडायला वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. पण जेव्हा एखादा शाखाअध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना, तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. त्यामुळे आज शाखाध्यक्ष माजिद शेख व वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी गटनेते साईनाथ बाबर, जनाधिकार शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी, उपशहराध्यक्ष आशिष देवधर, विभागाध्यक्ष गणेश भोकरे, महिला विभागाध्यक्ष सौ.नीता पालवे, उपशहराध्यक्ष अझहर सय्यद, एस टी कामगार शहर अध्यक्ष ललित तींडे, महिला उपविभागाध्यक्ष नाझ इनामदार, शाखाध्यक्ष सलीम सय्यद, मोहसीन शिकालकार, विजय रजपूत, संग्राम तळेकर यांचेसह भेटून आलो. पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव, असे ट्वीट केले आहे.

दरम्यान वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भुमिकेशी घेतलेल्या विसंगत भुमिकेमुळे आणि त्यानंतर केलेल्या ट्वीटमुळे वसंत मोरे राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र यानंतर वसंत मोरे पुढील पाऊल काय टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Vasant More Tweet)

Updated : 7 April 2022 9:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top