'जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का?: अरविंद केजरीवाल
X
दिल्लीमध्ये आजपासून ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून दिल्लीतील नागरिकांना कारमध्ये बसूनच कोरोना लस दिली जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या अभियानाला सुरुवात केली. दरम्यान यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
'जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का?' असा सवाल अरविंद केजरीवालयांज केंद्र सरकारला विचारला.
केंद्र सरकार गंभीर नाही-केजरीवाल
कोरोना संकटाबाबत केंद्र सरकार अजूनही गंभीर नसल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. राज्य सरकारने स्वतःच्या लसीची सोय करा. असं केंद्राने राज्यांना सांगितलंय. लसींबाबत अनेक राज्य केंद्राच्या संपर्कात आहे. वारंवार अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे विचारणा केली. मात्र, अजूनही कोणत्याही राज्याला एक लसही मिळवता आली नाही. लस बनवणाऱ्या कंपन्या केंद्राकडे बोट दाखवत आहे. सर्व टेंडर फेल होत आहेत. मग अशा परिस्थितीत राज्यांनी करायचं काय?असा सवाल उपस्थितीत करत केंद्र सरकार लस खरेदी का करत नाही असा प्रश्न पडत असल्याचे केजरीवालांनी म्हंटले आहे.