...तर मायावतीला अध्यक्ष करु: रामदास आठवले
X
रिपब्लिकन पक्ष हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात. त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी बसपा प्रमुख मायावती आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. असं आवाहन करत असताना मायावती या रिपब्लिकन पक्षात आल्या तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून मी स्वतः उपाध्यक्ष होईल. अशी ऑफरही आठवले यांनी दिली आहे. ते लखनौ येथे बोलत होते.
आठवले दोन दिवसाच्या लखनौ च्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लखनौ येथे रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेश उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांची भेट घेतली.
देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली असुन त्या मागणीचा पुनरुच्चार लखनौ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.