Home > Max Political > मी गेलो तर पक्षाचं काही अडणार नाही – फडणवीस

मी गेलो तर पक्षाचं काही अडणार नाही – फडणवीस

मी गेलो तर पक्षाचं काही अडणार नाही – फडणवीस
X

आरे ची कत्तल न्यायालयाच्या आदेशाने झाली, कत्तल हा शब्द योग्य नाही. मात्र न्यायालयाच्या आदेशाने झालंय. जेवढी झाडं तोडली त्यातून जो कार्बन न्युट्रॅलिटी होणार होती ती मेट्रोच्या केवळ 4000 फेऱ्यांमधूनच होणार आहे. झाडं तोडली गेली आहेत आता स्थगिती देऊन काय होणार आहे, असा सवाल ही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

सरकार बसून 8 दिवस उलटल्यानंतर ही अजून सरकारचं कामकाज अजून सुरू झालेलं नाही. पण निश्तिचपणे या सरकारला काही दिवस वेळ दिला पाहिजे, माझा डीएनए च विरोधी पक्षाचा आहे. आम्ही तुम्हाला वेळ द्यायला तयार आहोत, मात्र मिळालेल्या वेळेत तुम्ही जनहिताचे निर्णय घ्यायला तयार नाहीत अशी खंत ही फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा

गिरिश महाजन यांचं आव्हान स्वीकारलं – एकनाथ खडसे

हैदराबाद एन्काउंटरच्या घटनेनं उन्नाव पीडितेची हेडलाईन मॅनेज केली काय?

भाजप नेत्यांकडून ओबीसी नेत्यांची मनधरणी सुरु…

मी गेलो तर पक्षाचं काही अडणार नाही, पर्याय पक्षाला शोधता येतो. ओबीसी नेते नाराज आहेत अशा बातम्या आल्या. मी पंकजा मुंडे यांच्याशी बोललो आहे. खडसे नाराज असल्याच्या बातम्या आल्या. त्यांच्याशी ही बोललोय. भारतीय जनता पक्षातील कुणीही नेता बाहेर जाणार नाहीय. आमच्या आमदारांची जात आम्ही बघत नाही. तरी जात पाहिली तर 18 एससी एसटी, 35 मराठा, 37 ओबीसी आमदार आहेत. 7 खुल्या प्रवर्गातील आहेत त्यामुळे ओबीसी नेते नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं फडणवीस यांनी सांगीतलं आहे.

भविष्यात शिवसेना आणि भाजपा सोबत येईल का याबाबत मी काही बोलत नाही, पण आम्ही नैसर्गिक मित्र आहोत. आता उध्दव ठाकरे यांना कुणाकुणा सोबत बसावं लागतंय, भेटावं लागतंय. आम्ही तर मातोश्री वरून आलेला आदेश पाळत होतो. त्यांना ही लवकरच समजेल या युती मुळे त्यांचं काय नुकसान झालंय ते असं ही देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीत सांगीतलंय.

Updated : 7 Dec 2019 5:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top