Home > News Update > ... तर संपूर्ण महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन?

... तर संपूर्ण महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन?

... तर संपूर्ण महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन?
X

जागतिक महामारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देश व्यापत असताना महाराष्ट्राने पुन्हा एकदा संसर्गाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. काल राज्यभरात अकरा हजार करून संसर्ग नोंदवल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.केंद्रीय पथकाने व्यक्त केली तीव्र चिंता आणि वाढता संसर्ग पाहता अधिवेशन संपल्यानंतर राज्यभर मिनी लॉकडाऊन लावण्याचा पर्याय राज्य सरकार पडताळून पाहत आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या फैलावाला नागरिकांचा निष्काळजीपणाच जबाबदार ठरल्याची शक्यता केंद्र सरकारच्या पथकाने नोंदवली आहे. कोरोना महामारीच्या निर्बंध-नियमांना कंटाळून नागरिक आता सार्वजनिक ठिकाणी बेफिकीर वावरू लागले आहेत. त्यांना कोरोना संसर्गाची भीती उरलेली नाही. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यामागे हीच प्रमुख कारणे असतील, असे निरीक्षण नोंदवत केंद्रीय पथकाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारला निर्बंध शिथिल न करण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ञांच्या पथकाने नुकताच (1 आणि 2 मार्च रोजी) महाराष्ट्राचा दौरा केला. या पथकाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या अहवालात काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. या बैठकीनंतर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे प्रयत्न पुरेसे असल्याचे केंद्रीय पथकाने सांगितले. परंतु संसर्ग वाढल्यास राज्य सरकारला कठोर उपाय राबवण्यात शिवाय पर्याय राहणार नाही असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

तज्ञांच्या पथकामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक, राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राचे (एनसीडीसी) उपसंचालक संकेत कुलकर्णी आणि क्षयरोग व श्वसनविकारांसंबंधी राष्ट्रीय संस्थेचे प्राध्यापक आशिष रंजन यांचा समावेश होता. देशातील सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रामध्ये असुनही पहिल्या लाटेमध्ये महाराष्ट्राने दुनिया करण्यात आला होता आता दुसरी कोरोनाची लाट आणिकोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार ज्या उपाययोजना राबवत आहे तसेच जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यात इतक्यात कुठलीही ढिलाई न देण्याची सूचना केंद्रीय पथकाने केली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 90 हजारांहून अधिक आहे. कोरोनाची सध्याची लाट भयंकर नाही ही लोकांची मानसिकता बनलीय. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन आणि चाचणीचे गांभीर्य राहिलेले नाही. सप्टेंबरपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर आरोग्य यंत्रणेतही थोडी ढिलाई आलीय. ग्रामपंचायत निवडणुका, लग्नसराई, पुन्हा सुरू झालेल्या शाळा व तेथील मुले-पालकांची वर्दळ, सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी अशा विविध कारणांमुळे लोक एकत्र येऊ लागले आहेत. कोरोनावाढीला बळ मिळत आहे. राज्य सरकारने सध्या संसर्ग वाढ होत असणारे जिल्हे टार्गेट केले असून

अमरावतीमध्ये यापूर्वीच कठोर उपाय योजना लागू केल्या असून 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशत: जिल्हय़ात अंशतः लॉकडाऊन असणार आहे. तर प्रत्येक शनिवार व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असेल. अंशतः लॉकडाऊनच्या कालावधीत लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे. होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांचे जाळे भक्कम करा. हॉटस्पॉट विभागांतील सर्व लोकांची कोरोना चाचणी करा. पॉझिटिव्ह लोकांना वेगळे ठेवा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, दक्षता आणि चाचणीची मोहिम 'जैसे थे' ठेवा अशा सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहेत.

रविवारची रुग्णसंख्या –

राज्य – 11141

मृत्यू – 38

मुंबई – 1360

मृत्यू – 05

Updated : 8 March 2021 10:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top