2 महिन्याचा पगार मिळाला नाही तर कामगारांचेच नुकसान होणार आहे - अनिल परब
X
मुंबई : एसटी कामगारांप्रमाणेच जनतेचंही आमच्यावर दायित्व आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी आणखी ताणून धरू नये. त्यांनी कामावर परतावं.दोन महिन्याचा पगार मिळाला नाही तर एसटी कामगारांचेच नुकसान होणार आहे. असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
दरम्यान बडतर्फीची कारवाई सुरू झाली असून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. एसटी कर्मचाऱ्यांशी जसं दायित्व आमच्यावर आहे, तसंच जनतेचंही दायित्व आमच्यावर आहे. ही कारवाई सुरू झाल्याने होणारं नुकसान कोणताही नेता भरून देणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावं. 41 टक्के पगार वाढ दिली आहे. ताणून धरू नका कामावर या, असं परब म्हणालेत.
दरम्यान परब यांना पुन्हा एकदा सीबीआयचे समन्स आल्याची चर्चा सुरू असल्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आपल्याला कोणतंही समन्स आलं नाही. कोणी तरी अफवा पसरवत आहे. किरीट सोमय्या सांगत आहेत ते रिसॉर्ट माझं नाही. सातबारा माझ्या नावावर नाही. नोटीसही सदानंद कदम यांच्या नावावर आली आहे. माझ्या नावावर आली नाही. मी कोर्टात सोमय्यांविरोधात मानहानीचा दावा केला आहे.