काँग्रेसच्या प्रत्येक सभेत मी अनवाणीच; कारण राहुल गांधी पंतप्रधान..
राहुल गांधी यांच्या पदयात्रेत अनवाणी पायाने चालणाऱ्या व्यक्तीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. भारत जोडो यात्रा तामिळनाडू ते महाराष्ट्र असा प्रवास मी पायात चप्पल न घालता केला. राहुल गांधी यांची सभा जिथे जिथे असेत तिथे मी आर्वजून उपस्थित असतो.
X
भारत जोडो यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत. मात्र या गर्दीत पायात चप्पल न घालणारी व्यक्ती आपल्याला पाहायाला मिळाली. त्या व्यक्तीने गर्दीत अनेकांचे लक्ष देखील वेधून घेतले. त्या व्यक्तीचे नाव दिनेश शर्मा आहे. या व्यक्तीच्या डोक्यावर केशरी रंगाचा फेटा, पांढऱ्या रंगाचा कुर्ता, आणि हिरवा पायजमा असा वेश परिधान करुन, हातात तिरंगा घेऊन चालत असते. दिपक शर्मा यांनी आपले मत देखील व्यक्त केले आहे. दिपक उच्चशिक्षीत व्यक्ती असून. "राहुल गांधींची सभा कोणत्याही राज्यात असली तरी तेथे पायात चप्पल न घालता मी आर्वजून उपस्थितीत असतो.
ज्यावेळी राहुल गांधी पंतप्रधान होतील, त्यावेळीच मी पायात चप्पल घालणार, मी बारा वर्ष पायात चप्पल घातलेली नाही." असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.तसेच ते म्हणाले "राहुल गांधी यांची पदयात्रा ज्या ठिकाणी जाईल, त्या ठिकाण पायात चप्पल न घालता मी प्रवास करणार आहे. भारत जोडो यात्रेत मी तामिळनाडू ते महाराष्ट्र असा प्रवास अनवाणी पायांनी केला आहे." दिपक यांना राहुल गांधी यौद्धासारखे वाटतात. आगामी लोकसभेत राहुल गांधी नक्कीच पंतप्रधान होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वीही दिपक शर्मा हे उदयपूरच्या निवडणुकीत प्रचारा दरम्यान अनवाणी पायी दिसलेले होते.