Home > News Update > मी कुणासमोरही झुकणार नाही- पंकजा मुंडे आक्रमक

मी कुणासमोरही झुकणार नाही- पंकजा मुंडे आक्रमक

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने गोपीनाथ गड इथे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी पंकजा मुंडे प्रचंड आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या.

मी कुणासमोरही झुकणार नाही- पंकजा मुंडे आक्रमक
X

मागील पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला. तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदं मिळाली. पण आपल्याला यापैकी काही मिळालं नाही. त्यामुळे आता आपण आपल्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. “मी अमित शहा यांची भेट घेणार आहे. भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे, असं पंकजा म्हणाल्या. “माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल होत असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात" असा गर्भित इशाराही पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला. मी कुणासमोरही झुकणार नाही असा टोलाही त्यांनी यावेळी कुणाचं नाव न घेता लगावला.

“मला पहिल्या पाच वर्षाच्या राजकीय जीवनात जे अनुभव आले ते फार अनोखे आहेत. मी आज माझ्या पित्याच्या पुण्यस्मरणामध्ये त्यांच्या आठवणी, अश्रू दाबून आलेल्या नेत्यांचे मनात आभार मानून बोलायचा प्रयत्न करते आहे. पण मी बोलायचा प्रयत्न करत असताना माझ्या मनामध्ये जर सतत विचार केला की, माझ्या बोलण्याचे नेमके काय अर्थ निघतील ? तर गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित राजकारण मी करु शकणार नाही. ज्यादिवशी मी समोरच्या माणसाला आवडेल ते बोलणार नाही त्यादिवशी मला राजकारणाच्या मंचावर उभं राहण्याचा अधिकार नाही. म्हणून आज मीडिया फार माझ्या मागे आहेत. मी त्यांचे आभार मानते. त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. कारण माझं म्हणणं त्यांनी योग्य ठिकाणी पोहोचवलं. माझ्या माणसापर्यंत ते बरोबर पोहोचले. त्यामुळे त्यांना आज वाटतंय की, ताई काय बोलणार”, असं पंकजा आपल्या भाषणात म्हणाल्या.

Updated : 3 Jun 2023 6:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top