Home > News Update > अहमदनगरमध्ये राज्य नाट्य स्पर्धेत नथुराम गोडसे जिंदाबादच्या घोषणा

अहमदनगरमध्ये राज्य नाट्य स्पर्धेत नथुराम गोडसे जिंदाबादच्या घोषणा

अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा सुरु झाली आहे. यामध्ये 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय', हे नाटक दाखवण्यात आले. यावेळी या स्पर्धेत राज्य नाट्य स्पर्धेत गोडसे जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे.

अहमदनगरमध्ये राज्य नाट्य स्पर्धेत नथुराम गोडसे जिंदाबादच्या घोषणा
X

अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या 61 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' हे नाटक सादर करण्यात आले. मात्र या नाटकामध्ये चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत काही प्रेक्षकांनी नथुराम गोडसे जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. त्याबरोबरच या नाटकात सावकरांची प्रतिमा चुकीची दाखवल्याचे म्हणत काही प्रेक्षकांनी रंगमंचावर गोंधळ घातला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधित लोकांवर कारवाई केली.

महाराष्ट्रात अनेक वेळा 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाच्या प्रयोगावर वाद निर्माण झाले आहेत. तसेच सावरकर समर्थक उत्कर्ष गीते आणि अमोल हुबे पाटील यांनी यापुढे अहमदनगर जिल्ह्यात नथुराम गोडसेचे प्रयोग होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. मात्र सभागृहात नथुराम गोडसे जिंदाबाद घोषणा दिल्या जात असताना दुसऱ्या गटाने महात्मा गांधी की जय अशा घोषणा दिल्या. मात्र निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे नाटक बंद करावे लागले. यावेळी सावकरप्रेमींनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे म्हटले आहे.

Updated : 17 Nov 2022 8:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top