Home > News Update > हात जोडतो... प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका ; देवेंद्र फडणवीस

हात जोडतो... प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका ; देवेंद्र फडणवीस

मुंबई मेट्रोच्या कांजूरमार्ग कारशेडवरुन महाविकास आघाडी विरोधात भाजप संघर्ष अधिक तीव्र हात असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमधे कांजूरमार्ग येथे प्रस्तावित असलेल्या कारशेडबद्दल भूमिका मांडतांना विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यावर भाजपाकडूनही पुन्हा प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हात जोडतो... प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका ; देवेंद्र फडणवीस
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० डिसेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधताना कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबद्दल विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देत कद्रपणा करु नका एकत्र बसून चर्चा करु अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे. "प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला," असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.


"३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय चार वर्षांचा विलंब वेगळा Red exclamation mark symbol कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?," असा प्रश्न फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80 टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Updated : 20 Dec 2020 4:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top