सावरकरांच्या नातवाने तोडले अकलेचे तारे म्हणाले, गांधी हे राष्ट्रपिता नाहीत !
X
वि. दा. सावरकरांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानंतरही गोंधळ थांबलेला नाही. त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया सुरुच आहेत. राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमा दरम्यान सावरकर यांना महात्मा गांधी यांनी इंग्रजांची माफी मागण्यास सांगितले होते. त्यावरुन त्यांनी इंग्रजांची माफी मागितली. असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठं राजकारण पेटलं आहे. दरम्यान सर्व प्रकरणात आता सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मी 'महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही'. असं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणात असदुद्दीन ओवेसी यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. याच विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "ते एक विकृत इतिहास सादर करत आहेत. जर हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींना काढून टाकतील आणि सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील, ज्यांना महात्मा गांधींच्या हत्येसाठी दोषी ठरवले गेले होते. आणि ज्यांना न्यायमूर्ती जीवन लाल कपूर यांच्या तपासात 'हत्येत सहभागी' असे नाव देण्यात आले होते." अशी प्रतिक्रिया असुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे.
दरम्यान, सावरकरांचे नातू रंजित सावरकर म्हणाले, "मला वाटत नाही की, गांधी हे राष्ट्रपिता आहेत. भारतासारख्या देशात एक राष्ट्रपिता असू शकत नाही, इथं हजारो लोक आहेत ज्यांना आपण विसरलो आहोत." ते म्हणाले की, देशाचा इतिहास 40-50 वर्षांचा नसून 5000 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. या काळात असंख्य महान लोक घडले. असे हजारो लोक आहेत. 1883 मध्ये मुंबई (तत्कालीन बॉम्बे) येथे जन्मलेले, विनायक दामोदर सावरकर हे एक नेते, वकील, लेखक आणि 'हिंदुत्व' तत्त्वज्ञानाचे प्रवर्तक होते. त्यांनी हिंदू महासभेत सामील होऊन हिंदुत्वाचा प्रचार केला.
वर्ष 2000 मध्ये वाजपेयी सरकारने सावरकरांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांना प्रस्ताव पाठवला. पण त्यांनी तो स्वीकारला नाही.
1948 मध्ये, महात्मा गांधींच्या हत्येच्या सहाव्या दिवशी, विनायक दामोदर सावरकरांना गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याबद्दल मुंबईतून अटक करण्यात आली. मात्र, फेब्रुवारी 1949 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून सावरकरांना त्यांच्या राजकीय विचारांमुळे काढून टाकण्यात आलं. 1910 मध्ये नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्येतील सहभागाबद्दल त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली होती.
सावरकरांना प्रत्येकी 25 वर्षांच्या दोन स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आल्या आणि त्यांना शिक्षा भोगण्यासाठी भारतापासून अंदमान येथे पाठवण्यात आले. तज्ज्ञ सांतात की सावरकरांचे दुसरे आयुष्य येथून सुरू होते. त्या काळात लिहिलेली त्यांची अनेक पत्रे वादग्रस्त होती. त्यासाठी विरोधक त्यांना 'माफीवीर' म्हणत टीका करतात. अंदमानहून परत आल्यानंतर सावरकरांनी 'हिंदुत्व - हिंदू कोण आहे?' हे पुस्तक लिहिलं. ज्यात त्यांनी पहिल्यांदा हिंदुत्वाचा राजकीय विचारधारा म्हणून वापर केला.