रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालय...!
जपर्यंत आपण रुग्णाला उपचार देणारे अनेक रुग्णालय आणि डॉक्टर पाहिले असतील.. मात्र बीडमधे असं एक शासकीय जिल्हा रुग्णालय दाखवणार आहोत. जिथं रुग्णसेवा तर केलीच जाते, मात्र तिथं माणुसकीची जोपासना देखील केली जाते. भाषा समजत नसताना परराज्यातील जखमी रुग्णासाठी, जेव्हा जिल्हा रुग्णालयातील बेडलाचं, सीएस सलूनची खुर्ची बनवतात..तेव्हा हे पाहिल्यावर आपल्याही मनातील माणुसकी जागी होईल. पाहुयात डॉक्टरांच्या रूपातील देवदूतांनी, जिल्हा रुग्णालयात चालवलेला माणुसकी झरा... प्रतिनिधी हरिदास तावरेंचा स्पेशल रिपोर्ट..
X
हे आहे बीडचं शासकीय जिल्हा रुग्णालय..हे रुग्णालय तसं नेहमी वेगवेगळ्या कारणाने यापूर्वी चर्चेत आलेलं आहे. मात्र गत काही महिन्यांपूर्वी सीएस म्हणून डॉ.सुरेश साबळे आले, त्यानंतर रुग्णालयाचा चेहरा अन इथली रुग्णसेवा बदलत आहे.
गेल्या महिन्यांभरापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्याने, एका मनोरुग्ण अवस्थेतील जखमी व्यक्तीला, जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. हा दाखल होताचं तेथील डॉक्टर आणि आरोग्य सेवा देणाऱ्या सिस्टरसह ब्रदरची चांगलीच तारांबळ उडाली. त्याला कारणही तसंच आहे. कारण दाखल करण्यात आलेला रुग्ण हा परराज्यातील आहे. त्याला आपण काय बोलतोत ? हे समजत नाही..आणि तो काय बोलतोय ? हे इतरांना समजत नाही. त्यामुळं त्याला झालंय काय ? हे समजणं अवघड झालं. मात्र सीएस डॉ. डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश साबळे आणि इतर डॉक्टरांसह सिस्टर आणि ब्रदरनी त्याला उपचार देत काळजी घेतली. एवढेच नाही तर चक्क जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुधीर राऊत यांच्यासह सिस्टर आणि ब्रदरच्या माध्यमातून, त्याची वाढलेली दाढी आणि कटिंग देखील करण्यात आली. यावेळी त्यांनी बेडलाच सलूनच्या दुकानातील जणू काही खुर्ची बनवली होती..
तर याविषयी सीएस डॉ. सुरेश साबळे म्हणाले, की या रुग्णाला मागच्या महिन्यात अपघातात मार लागल्याने आमच्याकडे ॲडमिट करण्यात आलं होतं. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. परंतु त्याला आपली भाषा कळत नाही, कुठला आहे हे सांगताही येत नाही. तो अनोळखी असून त्याच्याबरोबर कोणीही नातेवाईक नाही. या दरम्यान त्याला मी पाहिलं असता, यावेळी त्याची कटिंग आणि दाढी वाढलेली दिसली. त्यामुळे मला पहिल्यापासूनच रुग्णसेवेची आवड असल्याने, मी नाहव्याला बोलावलं आणि त्याची इथेच दाढी व कटिंग केली.त्याचबरोबर आमचे आरोग्य विभागातील डॉक्टर, सिस्टर, ब्रदर त्याची व्यवस्थित काळजी घेतात. तो कुठला आहे याची माहिती घेणे सुरू असून, त्याला कुठली भाषा अवगत आहे, हे देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर विविध माध्यमातून ट्रेस करून त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. अशी माहिती डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.
डॉ. सुधीर राऊत म्हणाले, की मागच्या एक महिन्यापूर्वी एक अनोळखी व्यक्ती, रुग्णालयात ऍडमिट झाला. त्याला आपली भाषाही येत नाही. आम्ही त्याच्यावर सुरुवातीपासूनच उपचार चालू केले आहे. त्याच्या आरोग्याची, स्वच्छतेची काळजी घेत आहोत. मात्र आज माननीय जिल्हा शल्य चिकित्सक राऊंडवर आले असता, त्यांना दाढी आणि कटिंग वाढलेली दिसली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्याच्याशी संवाद करून त्याची दाढी आणि कटिंग करण्याचं ठरवलं. वेळोवेळी सीएस यांच्या सल्ल्यानुसार त्याला औषध उपचार दिला जातो. त्याच्या जेवणाची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था, नर्सिंग केअर हे केले जाते. परंतु त्याच्या दाढी आणि कटिंग करण्याचं जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आम्हाला आदेश दिल्याने, त्याप्रमाणे आम्ही आज त्याची दाडी व कटिंग करून, त्याचा एक लूक बदलण्याचा प्रयत्न केला नाही.
दरम्यान रुग्णांप्रति आपलं कर्तव्य बजावत, त्याचबरोबर निराधारांना आधार देण्याचं काम, बीड जिल्हा रुग्णालयात डॉ.सुरेश साबळे यांच्या माध्यमातून सुरू आहे. दरम्यान परराज्यातील रुग्णाला आपली भाषा येत नसतानाही, त्याच्या विषयीची आत्मीयता आणि समाजाप्रती असलेली माणुसकीची, याचं उत्तम उदाहरण बीड जिल्हा रुग्णालयात समोर आलंय. त्यामुळे याचा आदर्श इतर रुग्णालयाने घेतला तर सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळेल. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.