Passion is key : अशी करा सामाजिक उद्योजिकता?- प्रमोद वाकोडे
X
बाबासाहेब म्हणजे परीस, या परीसाने ज्या क्षेत्राला स्पर्श केला. ही क्षेत्र आता मोठी झाली आहेत. या प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांशी मॅक्समहाराष्ट्रने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधला आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेने आंबेडकरी समाजातील प्रमोद वाकोडे एक मोठे उद्योजक बनले.
टी-कॉफी असोसिएशन संस्थापक प्रमोद वाकोडे यांनी आंबेडकर जयंतीनिमित्ताने मॅक्समहाराष्ट्शी संवाद साधला. यावेळी त्यांनी येणाऱ्या नव्या पिढीने सामाजिक उद्योजिकता कशी करावी? हे सांगताना त्यांनी त्यांच्या 9 वर्षांच्या संघर्षमय प्रवासाचा लेखाजोखा मांडला आहे. हा त्यांचा संर्घष प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरेल.
प्रमोद वाकोडे सांगतात की…
टी-कॉफी असोशिएशनच्या माध्यमांतून सर्वाधिक उद्योजक कसे तयार होतील? यावर आमचा कल असतो. या संकल्पनेला सामाजिक उद्योजकता म्हणतात. मी BSEIT, MSW चं शिक्षण घेतलं. आयटी क्षेत्रात नोकरी केली. परंतु नोकरी करताना व्यवसाय करावा अशी संकल्पना डोक्यात आली. आमच्या घरातलं वातावरण सामाजिक असल्यामुळे मी सामाजिक उद्योजकता होण्याकडे लक्ष केंद्रित केलं. 9 वर्षांपूर्वी मी या संकल्पनेवर काम करु लागलो... परंतु सामाजिक उद्योजगता नेमकी कशी करावी? हा प्रश्न माझ्या समोर होता. सामाजिक उद्योजकता समजून घेण्यासाठी मी एमएसडब्लू केलं. त्यातून सामाजिक उद्योजिकतेची व्याख्या समजली. समाजात बदल आणि त्या बदलांतून पैसे कमावयचे म्हणजेच सामाजिक उद्योजिकता…
नोकरी सोडून मी व्यवसायाकडे वळालो... त्यावेळी कुटुंबियांचा पाठिंबा असल्यामुळे मी टी-कॉफी असोशिएशन व्यवसाय सुरु करू शकलो. यात समाजातील खालच्या वर्गाला सोबत घेऊन कामाला सुरुवात केली. सध्या 50 हजाराहून अधिक टी-वेन्डर्स सध्या या व्यवसायाशी जोडले गेले आहे.
वेगवेगळ्या राज्यातील शेतकरी या व्यवसायाशी जोडले गेले असून आम्ही यांच्यासाठी एक व्यासपीठ सुरु करुन दिलं आहे. सरकारसोबत संपर्क साधून आम्ही आमच्या व्यवसायाला नवीन आयाम दिला. ड्रेसकोड, पेंशन पॉलिसी, बल्क बार्गिंनिंग नावाची संकल्पना आणली. बुलडाणा जिल्ह्यात फॅक्टरी सुरु केली. मेट्रो टी-कॉफी ला जागतिक आणि देशपातळी हे प्रॉडक्ट पोहोचलं आहे. जर तुम्हाला उद्योग क्षेत्रात यायचं आहे? अशी तुमची इच्छा असेल तर यासाठी प्लानिंग कशी करावी? जाणून घेण्यासाठी पाहा टी-कॉफी असोशिएशनचे संस्थापक प्रमोद वाकोडे यांचा हा मार्गदर्शनात्मक व्हिडिओ....