Home > News Update > पप्पू कलानी किती दिवस जामीनवर आहे? राजकीय हालचालीने राजकीय वर्तुळात चर्चा

पप्पू कलानी किती दिवस जामीनवर आहे? राजकीय हालचालीने राजकीय वर्तुळात चर्चा

पप्पू कलानी किती दिवस जामीनवर आहे? राजकीय हालचालीने राजकीय वर्तुळात चर्चा
X

उल्हासनगर शहर म्हटलं की जपानी बाजार, गॅंगवार, अनाधिकृत बांधकाम, डुप्लिकेट वस्तूंचे मार्केट आपल्या डोळ्यासमोर उभा राहते. मात्र, त्याचबरोबर आणखी एका कुख्यात व्यक्तीचं नाव समोर येतं ते म्हणजे पप्पू कलानी.

पूर्वी 9 वर्ष आणि आता 6 वर्षे अशी एकूण 15 वर्ष जेल मध्ये राहून आलेला पप्पू कलानी सध्या जामीनवर आहे. राज्यात कोव्हिड काळात जे 1100 कैदी जामीनवर सोडले होते. त्यात पप्पू कलानीला पण सोडण्यात आले होते. पत्नी आणि माजी आमदार ज्योती कलानी यांच्या निधनानंतर पप्पू कलानी जामीनवर बाहेर आला आहे.

मात्र, जामीनवर असलेल्या पप्पू कलानीने सध्या त्याने राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं शहराचे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली असून याचा भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे.

उल्हासनगरचे राजकारण गेली सुमारे 35 वर्ष पप्पू कलानी आणि परिवाराभोवती फिरते आहे. आज पुन्हा पप्पू कलानी शहरात सक्रीय झाल्याने 'कलानी महल' हे निवासस्थान पुन्हा राजकीय घडामोडीचे केंद्र झाले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कलानीची भेट घेतली. त्यानंतर राजकीय घडामोडीना वेग आला आहे

मात्र, पप्पू कलानी च्या या राजकीय हस्तक्षेपानंतर पप्पू कलानी पुन्हा जेल मध्ये जावा. यासाठी त्याचे वैयक्तिक, राजकीय विरोधक सक्रिय झाले आहेत. पप्पू कलानी ज्यांच्यामूळे जेल मध्ये गेला. त्या कमल भतीजा यांनी पप्पू कलानीचा जामीन रद्द व्हावा. यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मात्र, पप्पू कलानी याने मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितले की, मी 99 वर्षाच्या जामीन वर आलो असून माझ्याकडे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे, जो मी वेळवर दाखवेल.

पुन्हा एकदा उल्हासनगरचे राजकारण पप्पू कलानी भोवती फिरत असून येणाऱ्या काळात हे राजकारण काय वळण घेते त्यानुसार सत्तेची गणिते बनतील बिघडतील का? हे सगळं सुरु असताना पप्पू कलानीचा जामीन रद्द व्हावा यासाठी कमल भतीजा यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. या संदर्भात आम्ही कमल भतीजा यांच्याशी बातचीत केली.. पाहा ते काय म्हणाले?

Updated : 7 Nov 2021 8:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top