Home > News Update > फुकट सेवा पुरवणारं गुगल पे पैसे कसं कमवतं?

फुकट सेवा पुरवणारं गुगल पे पैसे कसं कमवतं?

फुकट सेवा पुरवणारं गुगल पे पैसे कसं कमवतं?
X

सध्या आपण आपले आर्थिक व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीने करण्याला प्राधान्य देतो. त्यामध्ये आपण google pay, Phone pay, Paytm या ऍप्स चा वापर सहसा करतो. पण तरीही त्यातल्या त्यात आपण गुगल पे चा वापर जास्त करतो. का तर मोफत व्यवहार करता येतात.

युपीआयमार्फत सर्वात जास्त पेमेंट केले जातात. त्याचा मार्केट शेअर ६४ टक्के आणि मूल्याच्या बाबतीत ५० टक्के आहे. आणि याच युपीआय मधील सर्वाधिक मार्केट शेअर जर कुणाचा असेल तर तो गुगल पेचा आहे. तोही ४३ टक्के आहे. पण मग जर गुगल पे फीच आकारत नसेल तर मग ते पैसे कसे कमवतात?

पुढील चार गोष्टींवर गुगल पेचा व्यवसाय चालतो.

१. मोबाईल रिचार्ज

गुगल पेला सर्वात जास्त नफा हा मोबाईल रिचार्ज मधून होतो. आपण गुगल पेवरून रिचार्ज केला की मोबाईल ऑपरेटर कंपनी गुगल पेला कमिशन देते.

२. बिल पेमेंट

गुगल पे मार्फत आपण वीज, डीटीएच रिचार्ज, पाणी, विमा, कर्जाची परतफेड, पोस्टपेड बिल अशी बिलं आपण गुगल पे वरून भरतो. ही बिलं भरल्यानंतर संबंधित सेवा देणाऱ्या कंपनीकडून गुगल ला कमिशन दिलं जातं.

३. ब्रँड प्लेसमेंट फी

गुगल पेचं आणखी कमाईची स्त्रोत म्हणजे ब्रँड प्लेसमेंट फी आहे. Domino's, Zomato, Lenskart इत्यादी ठिकाणावरून आपल्याला सवलतीची कुपन्स दिली जातात. आपण गुगल पेच्या माध्यमातून व्यवहार केले की गुगल पे या ब्रॅंडकडून पैसे आकारते.

४. डेटा

गुगल पे वरून आपण केलेल्या व्यवहाराचा खूप मोठा डेटा त्यांच्याकडे उपलब्ध असतो. गुगल प्ले या डेटाचं विश्लेषण करून तो डेटा ते ऍप वर प्रसिध्द करतात. हा डेटा या ग्राहक कंपन्यांना देण्याचे गुगल पे पैसे आकारते.

Updated : 8 Oct 2022 7:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top