Home > News Update > आक्षेपार्ह व्हिडिओत भाजपचे नेतेच कसे ?

आक्षेपार्ह व्हिडिओत भाजपचे नेतेच कसे ?

आक्षेपार्ह व्हिडिओत भाजपचे नेतेच कसे ?
X

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांचा एका महिलेशी व्हिडिओ चॅट करणारा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वृत्तवाहिनीनं समोर आणलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. या व्हिडिओची मॅक्स महाराष्ट्र पुष्टी करत नाही. लोकशाही मराठी या न्यूज चॅनेलनं दाखविलेल्या बातमीच्या आधारे ही बातमी आम्ही देत आहोत. या बातमीतील व्हिडिओची आम्ही खात्री केलेली नाही. केवळ बातमी देणं हाच एकमेव उद्देश आमचा या बातमीमागे आहे.

कित्येक राजकीय नेत्यांविरोधात आक्रमकपणे भूमिका घेणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओचं लोकशाही वृत्तवाहिनीनं समोर आणलाय. सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरूय. अशा परिस्थितीत विरोधकांना यानिमित्तानं सरकारला घेरण्यासाठी आयतं कोलीतच मिळाल्याची चर्चा आहे. या व्हिडिओ चॅटमध्ये किरीट सोमय्या हे एका महिलेसोबत बोलतांना दिसत असून संबंधित महिलेचा चेहरा हा ब्लर करण्यात आलाय. यावेळी सोमय्या यांच्या चेहऱ्यावर अश्लील हावभाव दिसत आहेत. अशाप्रकारे सोमय्यांचा सहभाग असलेल्या जवळपास ८ तासांच्या व्हिडिओ चॅटच्या क्लिप असल्याचा दावाही या वृत्तवाहिनीनं केलाय.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. तर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीय. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही याप्रकऱणी प्रतिक्रिया दिलीय. दानवे म्हणाले, “ यासंदर्भात अनेक महिलांच्या तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्या असून त्याविषयी योग्यवेळी योग्य व्यासपीठावर त्याचा खुलासा करणार असल्याचं दानवे म्हणाले.

दरम्यान, हनीट्रॅप असो की अशा पद्धतीचं वर्तन असो दरवेळी तो भाजपच्या नेत्यांशीच कसा संबंधित असतो, असा प्रश्न आता सोशल मीडियावर नेटिझन्स उपस्थित करत आहेत.

Updated : 17 July 2023 9:48 PM IST
Next Story
Share it
Top