Home > News Update > संजय राऊतांच्या आरोपानंतर ED च्या अधिकाऱ्यांविरोधात SIT चौकशी

संजय राऊतांच्या आरोपानंतर ED च्या अधिकाऱ्यांविरोधात SIT चौकशी

संजय राऊतांच्या आरोपानंतर ED च्या अधिकाऱ्यांविरोधात SIT चौकशी
X

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अखेर राज्य सरकारच्या गृह विभागाने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात एसआयटीची नेमणूक केली आहे. राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. त्यातच किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप ईडीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अतिरीक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संजय राऊत यांनी आरोप केलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांची एसआयटीची स्थापना केली आहे. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज जनता दरबारसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अलीकडच्या काळात भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये तेढ व संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून गंभीर आहे. त्यामुळे यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच विरोधकांच्या मंदिरावर लाऊडस्पीकर लाऊन हनुमान चालिसा पठन करण्याबद्दल बोलताना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना पोलिस प्रशासन घेईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Updated : 5 April 2022 4:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top